Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीच्या खुनात अटक केलेल्या आरोपीने आणखी एका मुलीचा खून केल्याची कबुली

 


फलटण चौफेर दि ३० ऑक्टोबर २०२५

  सासपडे (ता. सातारा) येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने तपासादरम्यान आणखी एका मुलीचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि बोरगाव पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईतून ही बाब उघड झाली आहे.दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारास सासपडे गावातील घरामध्ये एका अल्पवयीन मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला होता. या घटनेवरून बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६३/२०२५, भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले.



तपासादरम्यान पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी राहुल बबन यादव (रा. सासपडे, ता. जि. सातारा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मुलीचा खून केल्याची कबुली दिली. पुढील तपासात यादवने दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सासपडे येथील आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचे आणि मृतदेह विहिरीत टाकल्याचेही उघड झाले.

या खुलाशानंतर बोरगाव पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १०/२०२५ (पूर्वीचा ३६३) मध्ये कलमे ३०२, ३७६ आणि २०१ वाढवून गुन्ह्याचा फेरतपास सुरू करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर (स्थानिक गुन्हे शाखा, सातारा) करीत आहेत.आज (३० ऑक्टोबर २०२५) रोजी आरोपी राहुल यादवला बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक ९०/२०२५ अंतर्गत अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सातारा यांच्यासमोर हजर करण्यात आले. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा सातारा करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.